Karad Highway Traffic : 'मलकापूरला कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी'; वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा
Container Halts Traffic Flow in Malkapur : नांदलापूर ते कोल्हापूर नाक्यापर्यंत तब्बल तासभर वाहतूक खोळंबली. कंटेनर अवजड असल्यामुळे महामार्ग कर्मचाऱ्यांनी कंटेनरला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निघत नव्हता. अथक परिश्रमाने तब्बल एक तासानंतर हा कंटेनर बाहेर काढण्यात यश आले.
Container stuck in Malkapur; traffic jam stretches over 3 km with vehicles stranded.esakal
मलकापूर: पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत महामार्गालगतच्या गटारात कंटेनर अडकल्याने वाहतूक कोंडी झाली. त्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने सुमारे तासभर महामार्ग ठप्प झाला.