
म्हसवड : कारंडेवाडी- कुकुडवाड (ता. माण) येथे ऊसतोडीच्या पैशावरून चुलत्याचा खून केल्याप्रकरणी पुतण्याला वडूज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. संदीप वसंत चव्हाण (वय २८, रा. कारंडेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.