

Thieves use pepper powder to steal mangalsutra in Khodjaivadi, leaving villagers in fear.
मसूर: खोडजाईवाडी (ता. कऱ्हाड) गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास दोन अनाेळखी चोरट्यांनी एका घरात घुसून डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण करत महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार घडला. यापूर्वीही दोन महिन्यांपूर्वी गावातील खोडजाईवाडी माता मंदिरातील दानपेटी फोडून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनांमुळे गावात दहशतीचे वातावरण आहे.