esakal | उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; उपमुख्यमंत्र्यांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

अनेकदा आंदोलने, उपोषण करूनही वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात नाहीत.

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; उपमुख्यमंत्र्यांना साकडे

sakal_logo
By
सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : अनेकदा आंदोलने, उपोषण करूनही येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील (Venutai Chavan Sub-District Hospital) रिक्त पदे भरली जात नाहीत. त्यामुळे यंत्रेही धूळखात पडली आहेत. त्याचा रुग्णांना उपयोग होत नाही. तातडीने रिक्त पदे भरावी, अशी मागणी मनोज माळी (Manoj Mali) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे केली. (Manoj Mali Demand To Deputy Chief Minister Ajit Pawar To Fill The Vacancy In Venutai Chavan Hospital)

येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातून कऱ्हाडसह पाटण, कडेगाव, वाळवा तालुक्‍यांतील गोरगरीब रुग्णांच्या दृष्टीने हे रुग्णालय महत्त्वाचे आहे. मात्र, तरी ही या रुग्णालयात आवश्‍यक डॉक्‍टर (Doctor) आरोग्य कर्मचारी व तज्ज्ञाची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. तेथे फिजिशियन, अर्थोपेडिक, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी-भिषक, दंत शल्यचिकित्सक, नेत्र चिकित्सक, आधी सेविका, परिसेविका, आधी परिचरिका, रेडियोलॉजिस्टिक आदी अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

हेही वाचा: आपत्तीत हलगर्जीपणा चालणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचे सक्त आदेश

आमच्या मागणीनुसार आमरण उपोषण सोडवताना लेखी आश्वासनानुसार उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई (Ministry of Health Mumbai) यांना व आरोग्यमंत्री यांना "खासबाब" म्हणून ट्रॉमा केअर स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन, सोनोग्राफीचे मशिन बंद आहे. बर्नवार्ड बांधकाम अपुरे आहे. त्या सोयी सुविधा तातडीने कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Manoj Mali Demand To Deputy Chief Minister Ajit Pawar To Fill The Vacancy In Venutai Chavan Hospital

loading image