
Udayanraje and Shivendraraje Bhosale’s political moves under spotlight amid speculations of manomilan in Satara taluka.
Sakal
सातारा तालुक्यात जिल्हा परिषदचे आठ गट, तर पंचायत समितीचे १६ गण आहेत. यावेळेस खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेही भारतीय जनता पक्षात आहेत. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांचे लक्ष नेत्यांच्या भूमिकेकडे आहे. नेत्यांनी मनोमिलनाच्या माध्यमातून भाजपच्या चिन्हावर लढायचे ठरविले, तर निम्म्या निम्म्या गट, गणांची वाटणी होईल; पण स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. सध्या तरी दोन्ही राजेंची भूमिका गुलदस्त्यात असल्याने इच्छुकांत अस्वस्थता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लक्ष घालण्याची तयारी केल्यामुळे दोन्ही राजे गटांच्या नाराजांची साथ त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
- उमेश बांबरे