
सातारा : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा कार्यकर्त्यांसह मुंबईतील आझाद मैदानावर उद्या (गुरुवार) सकाळी दहा वाजता पोचणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आज सातारा जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव साताऱ्यातील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.