मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबवा, अन्यथा आंदोलन; मराठा क्रांती मोर्चाचा थेट इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Kranti Morcha

'मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सुटेपर्यंत सर्वप्रकारची शासकीय नोकरभरती थांबवावी'

मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती थांबवा, अन्यथा आंदोलन; मराठा क्रांती मोर्चाचा थेट इशारा

कऱ्हाड (सातारा) : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रलंबित प्रश्न सुटेपर्यंत सर्वप्रकारची शासकीय नोकरभरती थांबवावी, अशी मागणी कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडं करण्यात आली. येत्या महिनाभरात त्याची कार्यवाही न झाल्यास १० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आलाय. त्याबाबतचे निवेदन तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले.

निवेदनातील माहिती अशी ः ओबीसी राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत राज्यातल्या सर्वप्रकारच्या निवडणूका बेमुदत पुढं ढकलण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत आहोत. ओबीसी बांधवांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ नये या काळजीपोटी राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल सरकारचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील यांनी 1982 ला मंत्रालयावर पहिला मोर्चा काढला. त्यावेळपासून आत्तापर्यत मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारं 50 टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गातून संविधानिक आरक्षण मिळू शकलेले नाही. यामुळं मराठा समाजातल्या अनेक गुणवंतांना शैक्षणिक व नोकऱ्यातील संधीपासून वंचित रहावे लागले आहे. हा खूप मोठ्ठा अन्याय मराठा समाजावर 40 वर्षांपासून होत आहे.

हेही वाचा: माझ्याकडचे अंतर्वस्त्र संपलेत, ते आणायला दिल्लीला गेलो होतो; असं का म्हणाले बसंत सोरेन?

2018 साली विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सत्ताकाळात गठीत वैधानिक गायकवाड आयोगाच्या सर्वेक्षण व अहवालानुसार मराठा समाजाला 50 टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देशांकडे दुर्लक्ष करण्यात आले. तत्कालीन सरकारने मराठा समाजाला 50 टक्के बाहेरील आरक्षण लागू केले, जे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडून विरोध नसताना देखील मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण मिळू शकलेले नाही. मराठा समाजावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत सर्वप्रकारच्या शासकीय नोकरभरती पुढे ढकलण्यात यावी. महिनाभरात गायकवाड आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाजाला 50 टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण लागू करावे. अन्यथा १० ऑक्टोबरपासून कऱ्हाडला बेमुदत साखळी उपोषण केले जाईल.

हेही वाचा: Anant Chaturdashi Live Update : पुढच्या वर्षी लवकर या.. दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला आज निरोप

Web Title: Maratha Kranti Morcha Demand To Stop Recruitment Until Maratha Reservation Is Granted Karad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..