

Vishwas Patil addressing the Marathi Sahitya Sammelan, vowing to defend his literary integrity while honoring Chhatrapati Shahu Maharaj’s legacy.
Sakal
सातारा: ज्या साताऱ्याच्या भूमीत मी मोठा झालो, त्याची माती मला पंढरीच्या बुक्क्यापेक्षाही महनीय आहे. मला इतिहासकार, गुरू किंवा ग्रंथाने इतिहास शिकविलेला नसून महाराष्ट्राच्या मातीतून, दऱ्याखोऱ्यातील प्रवासाने, क्षेत्र भेटीतील नागरिकांच्या संवादातून मिळालेल्या माहितीतून मी इतिहास शिकलो आहे. माझे इमान शब्दांशी आणि महाराष्ट्राच्या भूमीशी आहे. दहा हजार पाने लिहिणाऱ्या माझ्यासारख्या लेखकाच्या साहित्य संपदेतील एकही परिच्छेद चोरीचा आहे, असे सिद्ध झाल्यास मी त्या क्षणी लेखणी सोडेन, असे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी आज स्पष्ट केले.