

₹6,000 Crore Drug Seizure Rocks Satara; DRI Action in Karad Village
sakal
कऱ्हाड: कऱ्हाड तालुक्यातील पाचुपतेवाडी-तुळसण येथे मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर आज कारवाई झाली. त्यात सुमारे ७०० ग्रॅम एमडी जप्त केल्याचे समजते आहे. शासनाच्या डीआरआय म्हणजे गुप्तचर संचालनालय व पोलिसांसह फॉरेन्सिक लॅबच्या पथकाचाही कारवाईत समावेश आहे. कारवाईत पोलिस रेकॉर्डवरील संशयितांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, स्थानिक पोलिसांना त्या कारवाईची काहीच माहिती देण्यात आलेली नाही.