

Flames engulf the Koregaon chemical plant as fire brigade teams battle the massive blaze that caused over ₹8 crore in damages.
Sakal
लोणंद : कोरेगाव (ता. फलटण) येथे मॅग्नेशिया केमिकल कंपनी व अरिस्टा केमिकल कंपनीला आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीत एक कंटेनर, एक टेंपो व अन्य साहित्य जळून खाक होऊन सुमारे सव्वाआठ कोटी रुपयांचे नुकसान झाले. लोणंद पोलिसांनी विविध ठिकाणचे अग्निशामक दलांना पाचारण करून आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.