Huge fire in Satara’s Kodoli godown; electronics and vehicles gutted, losses estimated in lakhs.
Sakal
सातारा
Godown Fire:'सातारामधील कोडोलीत गोडाऊनला भीषण आग'; इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह वाहनेही खाक, लाखोंच्या नुकसानीचा अंदाज
Kodoli Warehouse Blaze: आग लागताच ती प्रचंड वेगाने पसरली. काही वेळातच रौद्ररूप धारण केलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे तीन बंब आणि चार छोट्या टॅंकरच्या साहाय्याने दोन तास प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही. या आगामीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कोडोली : कोडोली (ता. सातारा) येथील साई इलेक्ट्रॉनिक्स या होम ॲप्लायन्सेसच्या गोडाऊनला आज सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागताच ती प्रचंड वेगाने पसरली. काही वेळातच रौद्ररूप धारण केलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे तीन बंब आणि चार छोट्या टॅंकरच्या साहाय्याने दोन तास प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही. या आगामीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.