
सातारा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांग बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या आज येथील बाँबे चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या अचानक केलेल्या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. बाँबे रेस्टॉरंट चौक ते विसावा नाका मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली.