
Mayani birds struggle as conservation funds remain blocked; wet nests highlight four years of neglect.
Sakal
-अंकुश चव्हाण
कलेढोण: मायणी, सूर्याचीवाडी, येरळवाडी व कानकात्रे तलावांत दाखल होणाऱ्या पक्षी संवर्धनासाठी शासनाने १५ मार्च २०२१ रोजी मायणी पक्षी संवर्धन राखीवला राजपत्रित दर्जा दिला. मात्र, चार वर्षांनंतरही त्यास शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. दरम्यान, संवर्धनात येणाऱ्या येरळवाडी तलावाशेजारील गावांचा समाविष्ट होण्यास तीव्र विरोध असल्याने त्याबाबत आजअखेर निर्णय न झाल्याने मायणी पक्षी समूहास निधी मिळण्यात अडसर आल्याचा सांगितले जात आहे.