esakal | 'ग्रामस्थांनाे! कोरोनात तरी राजकारण बाजूला ठेवा'

बोलून बातमी शोधा

Meeting
'ग्रामस्थांनाे! कोरोनात तरी राजकारण बाजूला ठेवा'
sakal_logo
By
संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : कान्हरवाडी (ता. खटाव) गाव लहान असूनही येथील कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूदर चिंताजनक आहे. अशा कठीण काळात ग्रामस्थांनी राजकारण बाजूला ठेऊन परस्परांना व प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले.

शेतकऱ्यांची देणी थकविल्याने किसन वीर, खंडाळा कारखान्याला जप्तीची नोटीस

कान्हरवाडी येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक मालोजीराव देशमुख, सरपंच कांता येलमर, प्रशांत जाधव, शैलेंद्र येलमर, दीपाली येलमर, मोहन तुपे, अरुण चव्हाण, रविशास्त्री जाधव, माधुरी देवकर, चंद्रकांत येलमर, माजी सरपंच अमोल येलमर, पोलिस पाटील अजय येलमर यांच्यासह दक्षता समितीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या आणि एकूण झालेल्या लसीकरणाच्या कामाबाबत जमदाडेंनी नाराजी व्यक्त केली.

जनजागृती करून लसीकरण वाढविण्यासंबंधी त्यांनी सूचना दिल्या. कठीण काळात ग्रामस्थांनी राजकारण बाजूला ठेऊन परस्परांना व प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे. स्वयंशिस्त लावून घेतल्यास कोरोनावर मात करणे शक्‍य आहे, असे त्यांनी नमूद केले. शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कड कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री. जमदाडे यांनी दिला. मालोजीराव देशमुख, प्रशांत जाधव, शैलेंद्र वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

काळजी करु नका;गिर्याराेहक प्रियांकाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल; ठाकरे सरकारला मनसेचा इशारा