
मेढा : जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजन केले होते. आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालय ते बाजार चौक, वेण्णा चौक, तहसील कार्यालय मार्गावर मोर्चा काढण्यात आला, तसेच जावळीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.