esakal | भारीच! बाधितांच्या मदतीला धावली तरुणाई; 'सीएमएस'कडून 200 जणांना मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Medicine

भारीच! बाधितांच्या मदतीला धावली तरुणाई; 'सीएमएस'कडून 200 जणांना मदत

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : कोरोनाबाधित, त्यांच्या नातेवाईकांना योग्य त्या प्रकाराची मदत मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील "तरुणाई सीएमएस ग्रुप'च्या (CMS Group) माध्यमातून एकवटली आहे. या तरुणाईने वैद्यकीय मदत पथक तयार केले असून त्या माध्यमातून प्लाझ्मासह बेड, रुग्णवाहिका, जेवण, औषधे (Medicine) आदी गरजूंना पुरविण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या ग्रुपने अखंडित मदत पुरवत आजपर्यंत सुमारे 200 जणांना कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. (Medicine Assistance To 200 Citizens From CMS Group Satara News)

कोरोनामुळे सर्वसामान्य जनजीवन सैरभैर झाले असून त्याचा शिरकाव झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब खचून जाते. काय, कसे करावे, कोणाला सांगावे, कोणाकडे मदत मागावी आदी प्रश्‍नांमुळे बाधित कुटुंबाच्या अस्वस्थेत भरच पडते. बाधितांमुळे संपूर्ण कुटुंबाची होणारी परवड थांबविण्यासाठी नोकरी, शेती व इतर व्यवसाय करणारे काही युवक राज्यव्यापी छत्रपती मराठा साम्राज्य या ग्रुपच्या माध्यमातून गतवर्षी जिल्ह्यात सक्रिय झाले. गत लॉकडाउनमध्ये मदतीसाठी हाक मारणाऱ्यांना आवश्‍यक सुविधा पुरवणे त्यांनी सुरू केले. हे काम गेले आठ महिने अव्याहतपणे सुरू होते.

मराठा आरक्षण का मिळाले नाही शिवेंद्रसिंहराजेंनी केला उलगडा

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढल्याने "सीएमएस'मधील स्वयंसेवक पुन्हा एकदा जिल्ह्यात सक्रिय झाले. या सदस्यांनी तालुकानिहाय गट स्थापन करत जबाबदाऱ्या वाटून घेत बाधितांसह त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन, मदत आणि सोयी-सुविधा पुन्हा पुरविण्यास सुरुवात केली आहे. तालुकास्तरावरील स्वयंसेवक रुग्णवाहिका, बेड,प्लाझ्मा, लस, जेवण, तपासणीसाठी आवश्‍यक ती मदत उपलब्ध करून देत आहेत. पदरमोड करत दररोज विविध रुग्णालयांकडून माहिती संकलित करून आवश्‍यक ती मदत संबंधितांपर्यंत पोचविण्यासाठी गेले काही दिवस त्यांची दिवस-रात्र धडपड सुरू आहे. व्यवसाय, नोकऱ्या, शेती, उद्योग सांभाळत स्वत:चा, कुटुंबीयांचा कोरोनापासून बचाव करत मानवतेची भिंत उभारणारे हे स्वयंसेवक खऱ्या अर्थाने कोविड योद्धे ठरत आहेत.

तहसीलदारांचे 'ते' पत्र, फॅब्रिकेटर्संनी घेतला महत्वपूर्ण निर्णय; वाचले अनेकांचे प्राण

मदतीसाठी यांच्याशी साधा संपर्क...

बाधितांनी मदतीसाठी "सीएमएस' ग्रुपचे तालुकानिहाय गट कार्यरत असून इच्छुकांनी मदत, मार्गदर्शनासाठी ओंकार देशमुख (मो. 9423966686), दत्ता शिंदे (मो. 8237203834), कैलास बाकले (मो. 9595354523) यांच्याशी संपर्क साधावा.

Medicine Assistance To 200 Citizens From CMS Group Satara News