esakal | आरक्षणासाठी आता आरपारची लढाई; कऱ्हाडमध्ये मराठा बांधवांचा एल्गार
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षणासाठी आता आरपारची लढाई; कऱ्हाडमध्ये मराठा बांधवांचा एल्गार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन टाळत केवळ मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी हे आंदोलन केले. त्यानंतर राज्यभर काही ठिकाणी तीव्र तर काही ठिकाणी उपोषण अथवा अन्य लोकशाही मार्गाने शासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाड तालुक्‍याची काय भूमिका असावी, यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आरक्षणासाठी आता आरपारची लढाई; कऱ्हाडमध्ये मराठा बांधवांचा एल्गार

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : मराठा आरक्षणासाठी आता विविध पातळ्यांवरील आरपारची लढाई करावी लागेल. त्यासाठी मराठा समाजात जनजागृती करण्याचा निर्धार शुक्रवारी येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आला. त्यासाठी विविध समित्याही स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थी परिषद घेण्याचे आणि कायदेशीर लढाई लढण्याचेही या वेळी ठरवण्यात आले.

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यातूनच मध्यंतरी येथील दत्त चौकातील शिवतीर्थावर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन टाळत केवळ मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनीही हे आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यभर काही ठिकाणी तीव्र तर काही ठिकाणी उपोषण अथवा अन्य लोकशाही मार्गाने शासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाड तालुक्‍याची काय भूमिका असावी, यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

रेशन दुकानदारांचे प्रशासनाकडे अडकले तब्बल दहा कोट रुपये!

या बैठकीत आता आरक्षणासाठी आरपारची लढाईची तयारी करण्याचे ठरवण्यात आले. त्याचबरोबर त्यासाठी आता विविध पातळ्यांवर जबाबदाऱ्या देऊन कामाची विभागणी करण्याचेही ठरवण्यात आले. त्यामध्ये आंदोलन समिती, आयटी सेल, न्यायालयीन लाढाईसाठीची समिती, जनजागृतीसाठीची समिती यासह विविध समित्या बनवण्यात आल्या आहेत. आरक्षणास स्थगितीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्याचा विचार करून मराठा समाजातील विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यासाठी लवकरच एक विद्यार्थी परिषद घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. 

Video : महाबळेश्वरमध्ये दाटली धुक्याची दुलई! 

सरकारला कळकळीचे आवाहन 
मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले. मात्र, कोठेही राज्यात त्याला हिंसक वळण लागले नाही. मात्र, न्यायालयात स्थगिती मिळाल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजातील प्रत्येकात संताप, तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाचा संयम सुटण्याच्या आत सरकारने काय तो निर्णय घ्यावा, असेही कळकळीचे आवाहन या वेळी सरकारला करण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top