
Minister Makarand Patil meets Koyna, Dhom, Urmodi dam-affected families; assures proper rehabilitation.
sakal
सातारा : मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत धोम, उरमोडी, कण्हेर, महू-हातगेघर, धोम-बलकवडी, कोयना, निवकणे, नीरा- देवघर व वीर धरण येथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. या वेळी प्रकल्पग्रस्तांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पात्र प्रकल्पग्रस्त लाभापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न कालमर्यादेत सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.