Saint Paduka Darshan : महाराष्‍ट्रातील संतांच्‍या पादुका दर्शनाची मोठी संधी; वारकऱ्यांकडून 'सकाळ'च्या उपक्रमाचं कौतुक

कोपर्डे हवेली (Koparde Haveli) येथे श्री गुरू पादुका दर्शन सोहळ्याबाबत बैठक झाली.
Sakal Media Group Shree Family Guide Paduka Ceremony
Sakal Media Group Shree Family Guide Paduka Ceremonyesakal
Summary

‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे श्री फॅमिली गाइडच्या माध्यमातून श्री पादुका सोहळ्याचे आयोजन केले आहे.

कऱ्हाड : महाराष्ट्रातील १८ संत पादुकांचे दर्शन (Saint Paduka Darshan) एकाच ठिकाणी घ्यायची संधी हा उपक्रम आध्यात्मिक ऊर्जा वाढविणारा आहे, असे मत वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ मंदिरात (Siddhanath Temple) ‘सकाळ’च्या या उपक्रमाची वारकऱ्यांनी माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी स्वतःहून त्यामध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

कोपर्डे हवेली (Koparde Haveli) येथे श्री गुरू पादुका दर्शन सोहळ्याबाबत बैठक झाली. त्यावेळी तालुक्यातील बहुतांशी वारकऱ्यांनी बैठकीत सहभाग घेतला. प्रामुख्याने मोहन चव्हाण, शिवाजी पाटील, रामचंद्र चव्हाण, सुरेश चव्हाण, संपत चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, कृष्णत चव्हाण, संपत चव्हाण, उत्तम चव्हाण, बाबासाहेब चव्हाण, रामचंद्र चव्हाण, संपत चव्हाण, सागर चव्हाण, अनिकेत चव्हाण, अमित पाटील, शुभम साळवे, लक्ष्मण चव्हाण, संकेत चव्हाण आदी वारकरी उपस्थित होते.

Sakal Media Group Shree Family Guide Paduka Ceremony
Kolhapur Loksabha : तब्बल 25 वर्षांनंतर कोल्हापुरात दिसणार 'हात'; शाहू महाराजांच्या उमेदवारीने मिळाली प्रतिष्ठा

‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे श्री फॅमिली गाइडच्या माध्यमातून श्री पादुका सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यात २६ व २७ मार्च रोजी वाशी येथील शिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राज्यातील १८ संतमहात्मांच्या पादुकांचे एकाच ठिकाणी दर्शन मिळणार आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी ‘सकाळ’तर्फे वारकरी संप्रदायाची बैठक कोपर्डे हवेली येथे घेण्यात आली.

Sakal Media Group Shree Family Guide Paduka Ceremony
Kolhapur Loksabha : शामराव माळी यांचं 'घोडा' चिन्ह अन् काँग्रेस उमेदवाराचा फक्त 165 मतांनी झाला पराभव

या बैठकीत उपक्रमांविषयी ‘सकाळ’ माध्यम समूहाचे बातमीदार हेमंत पवार, वितरण विभागचे अजिंक्य करपे, बातमीदार जयंत पाटील यांनी माहिती दिली. श्री गुरू पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन व त्यामागची भूमिका मांडली. ‘सकाळ’च्या या उपक्रमांमुळे चांगली संधी उपलब्ध झाल्याचे मनोगत अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com