Mhaswad police awarded Best Performance for July; Superintendent honors team for outstanding service and achievements.Sakal
सातारा
Mhaswad Police: म्हसवड पोलिसांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार; अधीक्षकांच्या हस्ते जुलै महिन्यातील कामगिरीसाठी गौरव
Mhaswad Police Honored with Best Performance Award: सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार मिळालेला आहे, तसेच महिलांविरोधातील घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास अवघ्या २४ तासांत पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याबद्दलही गौरविण्यात आले.
म्हसवड : सातारा जिल्ह्यात गुन्हे कार्यालयीन उपक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल म्हसवड पोलिस ठाण्यास जुलै २०२५ या महिन्यातील कामगिरीसाठी ‘सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे’ पुरस्काराने पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सन्मानित केले.

