Mhaswad News: म्‍हसवडला बैल गेला अन्‌ झोपा केला..; लाखोंच्‍या नुकसानीनंतर अतिक्रमण हटवण्‍यासाठी प्रशासनाला जाग

Chaos in Mhaswad: अनेकांनी बँकेची कर्जे काढून दुकानात विविध वस्तूंचा माल भरला होता. तो पाण्याने भिजून विक्रीलायक राहिला नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. त्‍यानंतर आज पालिकेने रस्‍त्‍यानजीकच्‍या गटारांवरील तसेच रस्‍त्‍याकडेची अतिक्रमणे आज पोलिसांच्या मोठ्या संख्येतील बंदोबस्तात काढून टाकण्याची मोहीम राबविली.
A bull roaming freely in Mhaswad caused property damage, prompting administration to take immediate action.

A bull roaming freely in Mhaswad caused property damage, prompting administration to take immediate action.

Sakal

Updated on

म्हसवड : शहरासह परिसरात शनिवारी झालेल्या संततधार पावसाने गटारे तुंबून येथील शिंगणापूर चौक, बसस्थानक परिसरातील रस्‍त्‍याकडेची दुकाने पाण्यात बुडून अनेक दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्‍यानंतर आज रविवारी खडबडून जागे झालेले प्रशासन मोठ्या अधिकाऱ्यांच्‍या समवेत यंत्रणेसह घटनास्‍थळी पोहोचले, ते तेथील अतिक्रमणे हटवण्‍यासाठी. ही मोहीमही राबवली गेली; पण या कारवाईने आज दिवसभर अतिक्रमणे हटाव मोहीम म्हणजे ‘बैल गेला अन्‌ झोपा केला’ अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांत उमटली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com