Humanity Story: रात्रीच्या वेळी दवाखान्याच्या पायरीवरच प्रसूती! अनोळखी तरुणाची आर्त हाक, आई-बाळाला नवजीवन, थरारक घटनेने डाेळे पाणवले..

Emotional incident of humanity at hospital: डॉ. कांबळे यांच्या धाडसाने दोन जीव वाचले, परिसरात कौतुकाची लाट
Hospital entrance where an emotional midnight delivery took place, saving the lives of mother and newborn.

Hospital entrance where an emotional midnight delivery took place, saving the lives of mother and newborn.

sakal

Updated on

-संदीप पारवे

मसूर: वैद्यकीय व्यवसाय हा केवळ उपजीविकेचे साधन नसून, ती माणुसकीची सेवा आहे. याची प्रचिती कऱ्हाड- मसूर मार्गावरील एस. एन. साळुंखे यांच्या स्वानंद कॉम्प्लेक्समधील कृष्णाकाठ क्लिनिकसमोर नुकत्याच घडलेल्या एका थरारक घटनेतून समाेर आली. रात्री दहाच्या दरम्यान क्लिनिकचे शटर बंद करून घराकडे निघण्याच्या तयारीत असलेल्या डॉ. स्नेहल कांबळे यांना एका अनोळखी तरुणाची आर्त हाक ऐकू आली. काही क्षणांतच रस्त्यावर पायरीवरच एका गर्भवती महिलेची यशस्वी प्रसूती करून आई-बाळाला नवजीवन बहाल केले. भाषेचा अडथळा, प्रचंड रक्तस्राव, कागदपत्रांची कमतरता आणि मर्यादित वैद्यकीय साधनांमध्येही त्यांच्या तत्परतेने दोन जीव वाचले. या घटनेने परिसरात डॉ. कांबळे यांच्या धाडसाचे आणि निःस्वार्थ सेवेचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com