
सातारा/ कऱ्हाड : गायीच्या दुधाला ४० रुपये, तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर दर मिळावा, दुधाचे थकलेले अनुदान तातडीने मिळावे, तसेच खतांप्रमाणे पशुखाद्यालाही अनुदान द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास प्रतिसाद मिळाला. बहुतांशी दूध संघांतून संकलन झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दहा लाख लिटर दूध संकलन ठप्प झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कऱ्हाडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आंदोलन केले. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.