Revenue Minister Chandrashekhar Bawankule addressing citizens in Wai, assuring substantial development funds and seeking support for the BJP candidate.
Sakal
सातारा
Chandrashekhar Bawankule: वाईच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देऊ: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; भाजपच्या उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन
BJP candidate: बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधताना वाईच्या विकासासाठी स्थिर आणि सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. “राज्य सरकारतर्फे वाईच्या प्रगतीसाठी आवश्यक तो निधी दिलाच जाईल. फक्त नागरिकांनी विकासाभिमुख नेतृत्वाला साथ द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
वाई : भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल सावंत आणि सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. नगराध्यक्ष श्री. सावंत आणि सर्व नगरसेवकांच्या पाठीशी भाजप सरकार खंबीरपणे उभे असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्याचे वचन देतो, असेही त्यांनी सांगितले.

