"Honoring Dhairyashil Kadam Is My Duty": Minister Jaykumar Gore in Pusesawali
सातारा
Jayakumar Gore: धैर्यशील कदमांच्या सन्मानाची जबाबदारी माझी: मंत्री जयकुमार गोरे; पुसेसावळीत विविध विकासकामांचा प्रारंभ
विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रत्येक गावाचा विकास महत्त्वाचा आहे. ग्रामविकाससारखे महत्त्वाचे खाते माझ्याकडे आहे. धैर्यशील व विक्रमशील कदम यांनी पुसेसावळी भागाच्या विकासकामांसंदर्भात ज्या काही मागण्या केल्या आहेत, त्या सर्व पूर्ण केल्या जातील.
पुसेसावळी : विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तरच्या परिवर्तनाच्या लढाईत धैर्यशील कदम यांनी मोठा त्याग केला. त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, त्यांच्या योग्य सन्मानाची जबाबदारी माझी राहील, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.