
कऱ्हाड: ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी आजच्या दिवशी ७३ वर्षांपूर्वी देशाला ऑलिंपिकपदक मिळवून दिल्याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्यासमवेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑगस्टला मुंबईत अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीदिनी खाशाबा जाधवांच्या नावे देशी खेळांचा महाकुंभ आयोजित केल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे पत्रकारांना दिली. ऑलिंपिकवीर (कै.) जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव यांनी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.