Minister Makarand Patil: आवश्यक ठिकाणी बचावकार्य सुरू करा: मंत्री मकरंद पाटील; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून अतिवृष्टीचा आढावा
Heavy Rainfall: अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर सुरक्षितस्थळी करावे. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. यासाठी प्रशासनाने वेगाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पावसामुळे बाधित होणाऱ्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करावेत.
Heavy Rainfall: Minister Patil Directs Relief Measures Across Affected AreasSakal
सातारा : राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी आज मुंबई येथील मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन अतिवृष्टीमुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.