केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी कऱ्हाडात

Minister Nitin Gadkari
Minister Nitin Gadkariesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचा लोकार्पण आणि विविध कामांचा कोनशीला अनावरण शनिवारी (ता. २६) रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते होत आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता येथील फर्न हॉटेल येथे समारंभही होणार आहे. पाच हजार 971 कोटींच्या 403 किलीमीटर रस्त्यांचा उद्घाटनात समावेश आहे.

Summary

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी कऱ्हाड दौऱ्यावर आहेत.

कागल ते सातारा रस्त्याचे सहापदरीकरण, महामार्गावरील मसूर फाटा, इंदोली, काशिळ रस्ता येथे अंडर पास पुलाचे भुमिपूजन, मिरज येथे रस्त्याची सुधारणा, आजरा ते आंबोली ते संकेश्वर रस्त्याचे उन्नतीकरण, कळे ते कोल्हापूर रस्त्याचे उन्नतीकरण आणि घाटमाता ते हेळवाक रस्त्याचे मजबुतीकरण आदी कामांचा त्यात समावेश आहे. त्यासह नागज ते मुचंडी रस्त्यासह तासगाव ते शिरढोण रस्ता लोकार्पण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सेंट्रल रस्ते निधीतंर्गत डिचोली- हेळवाक-वहाटळ-शेणोली स्टेशन, पाटण-तारळे-काशिळ रस्त्यासह वाल्हे -जेजुरी -लोणंद-सातारा रस्त्याचे चौपदरीकरण आहे. शिरसावडी-शेणवडी-खेराडे रस्ता, मांडवे- नागठाणे- नांदगाव आणि फलटण- आसू-तावशी आदी रस्त्यांची सुधारणा कामाचाही त्यात समावेश आहे.

Minister Nitin Gadkari
'सातारकर सोबत आहेत ना.. मग बस्स! मला आणखी कोणाची गरज नाही'

केंद्रीय मंत्री गडकरींसह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने, खासदार संजय पाटील, खासदार रणजीत नाईक-निंबाळकर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे, मोहनराव कदम, अरुण लाड, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, जयंत आसगावकर, पी. एन. पाटील, दीपक चव्हाण, सुरेश खाडे, प्रकाश आबिटकर, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, राजू आवळे, महेश शिंदे, जयकुमार गोरे, विक्रमसिंह सावंत, ऋतुराज पाटील, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे उपस्थितीत राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com