esakal | Satara: भूस्खलनग्रस्तांना आरसीसी घरे देणार: गृह राज्यमंत्री देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

भूस्खलनग्रस्तांना आरसीसी घरे देणार: गृह राज्यमंत्री देसाई
भूस्खलनग्रस्तांना आरसीसी घरे देणार: गृह राज्यमंत्री देसाई

भूस्खलनग्रस्तांना आरसीसी घरे देणार: गृह राज्यमंत्री देसाई

sakal_logo
By
विजय लाड ः सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर (सातारा): लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी भूकंपग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन केले. त्याच पद्धतीने दरडग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन त्यांनी पसंत केलेल्या जागेवर आरसीसी घरे बांधून देण्यात येतील, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दरडग्रस्तांना दिली.

हेही वाचा: कोयनानगर :भूस्खलनग्रस्तांना आज खोल्यांच्या चाव्या मिळणार

कोयनानगरमध्ये दरडग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी खोल्यांच्या चाव्या प्रदान वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, अशोकराव पाटील, कोयनानगरचे सरपंच रमेश कदम, शैलेंद्र शेलार, उपअभियंता अजित पाटील, सागर पाटील, अरुण जाधव, विजय बाकाडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘‘मिरगाव, हुंबरळी व ढोकावळे गावांना जागा पसंत करण्याचे अधिकार दिले आहेत. जागा पसंत केल्यावर घरे बांधण्याची कार्यवाही केली जाईल. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी घर, शेतीचे झालेले अंशतः नुकसानीची मदतीचे वाटप आठवड्यात सुरू होईल.’’ या वेळी मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील निवारा नष्ट झालेल्या ७८ आपत्तीग्रस्तांना खोल्यांचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा: कोयनानगर: ढोकावळे आपत्तीग्रस्तांचा तहसीलवर मोर्चा

जलशुद्धीकरणासाठी 20 लाख देणार

कोयनानगरमध्ये येणारे धरणातील पाणी अजूनही अशुद्धच येत आहे. ते पाणी शुद्ध करण्यास कोयना प्रकल्प प्रशासनाला जिल्हा नियोजन समितीमधून 20 लाख रुपयांचा निधी देणार आहे. ते काम दर्जेदार करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

loading image
go to top