esakal | पोलिसही कोरोनाच्या विळख्यात; आमदारांची मदत घेण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

बोलून बातमी शोधा

Police
पोलिसही कोरोनाच्या विळख्यात; आमदारांची मदत घेण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आदेश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कडक कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करावी, अशा सक्त सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलिस विभागाला केल्या.

गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलिस महानिरीक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. पोलिसही बाधित होत आहेत, या बाधित पोलिसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड सेंटर सुरु करा, अशा सूचना करुन श्री. देसाई पुढे म्हणाले, यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या. तसेच जिल्हा नियोजनमधूनही निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम पोलिस करीत आहेत त्यांना महानगर पालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

'अधिकारी थेट पैसे मागण्याचे धाडस करतो जेव्हा त्याला राजकीय वरदहस्त असतो'

सातारकरांनाे! पालिकेने सुरक्षिततेसाठी घेतला तातडीने निर्णय

Edited By : Balkrishna Madhale