Shambhuraj Desai : अन् शिंदे गटाचे शंभूराज देसाई पोहोचले थेट तुरुंगात; काय घडला नेमका प्रकार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai News

राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय.

Shambhuraj Desai : अन् शिंदे गटाचे शंभूराज देसाई पोहोचले थेट तुरुंगात; काय घडला नेमका प्रकार?

Shambhuraj Desai News : राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. मविआचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झालंय. त्यानंतर विविध निवडणुकांची चाहुल लागलीय.

सातारा जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तसंच जिल्ह्यात मोठ्या यात्राही होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आत्तापासूनच तयारी करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिले. सातारा पोलीस (Satara Police) विभागाचा आढावा पालकमंत्री देसाईंनी शिवतेज हॉल इथं घेतला. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला कोल्हापूर परिक्षेत्राचे प्र. पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पथदर्शी प्रकल्प साताऱ्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला गती देण्यात यावी. तसंच जिल्ह्यातील अवैध दारु विक्री बंद झाली पाहिजे यासाठी पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागानं संयुक्तपणे कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

देसाई पुढं म्हणाले, सातारा पोलीस दलाचे मंत्रालयस्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत तेही तातडीनं सोडविले जातील. पालकमंत्री म्हणून पोलीस विभागाला नेहमीच सहकार्य राहील. पोलीस विभागानं सकारात्मक पद्धतीनं काम करुन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे, असंही पालकमंत्री देसाईंनी नमूद केलं. यावेळी देसाईंनी तुरुंगातील विविध विभागांचा आढावाही घेतला.