

Minister Shivendrasinhraje offering a cheque of ₹10 lakh to the CM Relief Fund during a wedding ceremony.
Sakal
सातारा : येथे कन्येच्या झालेल्या विवाह सोहळ्यात सार्वजनिक बांधकाममंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक अत्यंत अभिनंदनीय पाऊल उचलून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले. कन्या ऋणालीराजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुख यांच्या विवाहाप्रसंगी त्यांनी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.