
Police inspecting the crime scene at Sasapade village in Satara where minor girl Arya was found dead under mysterious circumstances.
Sakal
काशीळ : सासपडे (ता. सातारा) येथील आर्या सागर चव्हाण (वय १३) हिचा काल दुपारी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या खुनाबाबत पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उलगडा करून संशयितास ताब्यात घेतले आहे. राहुल बबन यादव (वय ३७, रा. सासपडे) असे संशयिताचे नाव आहे.