

Miraj Construction Accident
esakal
मिरज : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेली स्वागत कमान कोसळून नऊ कामगार जखमी झाल्याप्रकरणी ठेकेदार संजय खराडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या. संबंधित ठेकेदाराकडे कामगार परवाना नसल्याचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने कामास मज्जाव केला असतानाही बांधकाम सुरू असल्याची माहिती बैठकीत समोर आली.
सोमवारी प्रवेश कमानीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना कमान अचानक कोसळली. काँक्रिट, स्टील व लाकडी आधाराच्या ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले होते. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढून सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आमदार खाडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली तसेच दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुर्घटनेचा आढावा घेण्यात आला. हलगर्जीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश खाडे यांनी दिले. ठेकेदाराविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासह कामगार कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
जखमी कामगारांना पूर्ण उपचार मिळावेत जखमी कामगारांना योग्य उपचार मिळावेत. पूर्णपणे बरे होऊन कामावर रुजू होईपर्यंत त्यांना वेतन देण्यात यावे. तसेच शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार खाडे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.