
सातारा : ‘गोंधळाची परंपरा’ या नावाने ओळखली जाणारी शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा यावर्षीही अवघ्या १५ मिनिटांत गुंडाळली. सभेत सर्व विषय प्रचंड गदारोळात मंजूर करण्यात आले. सभेत दोन सभासदांना मयत घोषित केल्याने मंडळाच्या हलगर्जीपणाचा निषेध करत उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.