
कऱ्हाड :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या समन्वयाची बैठक घेण्यासंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात महायुतीला फायदा होईल, असा सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली. आमदार डॉ. भोसले यांनी येथील विश्रामगृहात काही नागरिकांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.