
जामिनासाठी जिल्हा न्यायालयात आमदार गोरेंनी धाव घेतली होती.
भाजप आमदार जयकुमार गोरेंवर अटकेची टांगती तलवार, कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला
वडूज (सातारा) : मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore), महेश बोराटे व दत्तात्रय घुटूगडे यांनी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात (Satara District Sessions Court) अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आलाय.
याबाबत अधिक माहिती अशी की, मायणीतील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात (Dahiwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे. यापूर्वी या गुन्ह्यांमध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
हेही वाचा: भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणाची येथील सत्र न्यायालयाऐवजी अन्यत्र सुनावणी व्हावी, यासाठी जिल्हा न्यायालयात आमदार गोरे यांनी धाव घेतली होती. हा अर्ज जिल्हा न्यायालयानं फेटाळला होता. त्यामुळं येथील न्यायालयातच काल (गुरुवारी ता. 5) अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. यावर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निकालासाठी आजची तारीख दिली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आमदार गोरेंसह सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. फिर्यादीच्या बाजूनं सरकारी वकील मिलिंद ओक (Milind Oak) यांनी बाजू मांडली.
हेही वाचा: हनुमानाचं नाव ऐकून रावणच सूडानं पेटला असेल..; चित्रा वाघांनी घेतली राणांची भेट
Web Title: Mla Jaykumar Gore Bail Application Rejected By Satara District Sessions Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..