हनुमानाचं नाव ऐकून रावणच सूडानं पेटला असेल..; नवनीत राणांच्या भेटीनंतर चित्रा वाघ संतापल्या I Chitra Wagh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana Chitra Wagh

'एका महिला खासदाराला ठाकरे सरकारनं दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले.'

हनुमानाचं नाव ऐकून रावणच सूडानं पेटला असेल..; चित्रा वाघांनी घेतली राणांची भेट

मातोश्रीवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याबरोबरच राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) गुरुवारी अखेर कारागृहाबाहेर पडले. मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने नवनीत राणा या थेट लीलावती रुग्णालयाकडे (Lilavati Hospital) रवाना झाल्या. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राणा दाम्पत्याला बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला होता. पण, न्यायालयाच्या आदेशाची प्रत साडेपाच वाजेपर्यंत कारागृहात न पोहोचल्यामुळं त्यांना बुधवारची रात्रही कारागृहात काढावी लागली. नवनीत यांना भायखळा कारागृहात, तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. नवनीत राणा यांना मणका आणि कंबरदुखीसह स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री बनविण्यासाठी माझ्याकडे मागितले 2500 कोटी; भाजप आमदाराचा दावा

आज (शुक्रवार) भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी खासदार नवनीत राणा यांची लीलावती रुग्णालयात जावून त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) ट्विटव्दारे निशाणा साधलाय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, एका महिला खासदाराला ठाकरे सरकारनं (Thackeray Government) दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला. हनुमानाचं नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडानं पेटला असेल, असा घणाघात त्यांनी ठाकरे सरकार केलाय. नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत, हे सरकारनं विसरू नये, असा इशाराही त्यांनी दिलाय. काल आमदार रवी राणा यांनी रुग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली, तेव्हा नवनीत यांना रडू कोसळलं होतं.

Web Title: Bjp Leader Chitra Wagh Visited Lilavati Hospital And Met Navneet Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top