भाजपचा साधा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा : आमदार गोरे

Jayakumar Gore
Jayakumar Goreesakal
Updated on: 
Summary

'आगामी काळात भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरणार आहे.'

वडूज (सातारा) : राज्यातील महाविकास आघाडीचं अपयशी सरकार (Mahavikas Aghadi government) अपशकुनी आहे. ते सत्तेत आल्यावर कोरोना आला, मराठा (Maratha Reservation), ओबीसी आणि पदोन्नतीतील आरक्षण गेले. अतिवृष्टीनं नुकसान झालं. शेतकऱ्यांची वीज तोडली गेली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि राज्याचे नुकसान करणाऱ्या अनेक घटना घडल्या. आगामी काळात तळागाळापर्यंत मजबूत संघटनात्मक बांधणी असलेला भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपचा (BJP) साधा कार्यकर्ताच राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी सांगितलं.

येथे भाजपच्या वतीने आयोजिलेल्या सत्कार समारंभानिमित्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, विकल्प शहा, अनिल माळी, विश्वासराव काळे, नगरसेविका रेश्मा बनसोडे, रेखा माळी, किशोरी पाटील, जयवंत पाटील, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, प्रदीप शेटे, अमोल गोडसे, ओंकार चव्हाण, काकासाहेब बनसोडे, विक्रम रोमन, डॉ. वैभव माने, प्रशांत गोडसे, नीलेश कर्पे आदी उपस्थित होते.

Jayakumar Gore
शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर काँग्रेस काय म्हणाली माहितीय?

आमदार गोरे म्हणाले, गेल्या १४ वर्षांपासून दोन्ही तालुक्यांतील अनेक महाभागांना फलटण, बारामतीपासून जिल्ह्यातील मात्तब्‍बरांची फौज विरोधात असूनही जयकुमार तीन वेळा आमदार कसा झाला, असा प्रश्न पडला आहे. माझ्या मागे सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेची ताकद असल्यानेच हे शक्य झाले आहे. सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. सर्वांच्या सहकार्याने पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे. फडणवीस साहेबांच्या (Devendra Fadnavis) कार्यकाळात पूर्णत्वाला गेलेल्या विकासकामांची उद्‌घाटने करण्याव्यतिरिक्त आघाडी सरकारने अडीच वर्षांत काहीच केले नाही.’’ या वेळी श्री. चव्हाण, श्री. शहा, श्री. काळे, डॉ. माने आदींनी मनोगत व्यक्त केले.

Jayakumar Gore
किणी प्रकरणाची आठवण करून देत आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com