Political News : शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर काँग्रेस काय म्हणाली माहितीय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर काँग्रेस काय म्हणाली माहितीय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. शरद पवार-नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर काँग्रेसनंही आपली प्रतिक्रिया दिलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) शरद पवार-पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवर भाष्य केलंय.

नाना पटोले म्हणाले, केंद्राच्या अत्याचारी (ED) यंत्रणेची माहिती देण्यासाठी शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटायला दिल्लीला गेले होते. केंद्राच्या जुलमी आणि अघोषित आणीबाणीबाबत शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतलीय, त्यामुळं वेगळा अर्थ काढण्याची काही गरज नाही. तसंच केंद्रीय तपास यंत्रणेचा कितीही दुरुपयोग केला, तरी हे सरकार (महाविकास आघाडी सरकार) पडणार नाहीय, असं सांगत त्यांनी भाजपला टोला लगावलाय.

हेही वाचा: राकेश टिकैत पुन्हा शेतकरी आंदोलन छेडणार; मोदी सरकारला दिला थेट इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीवर मनसेनंही प्रतिक्रिया दिलीय. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी 'दिल्लीत काल माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा' अशा आर्त हाका ऐकू आल्या', असं म्हणत खोचक टोला लगावलाय. देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलंय.

हेही वाचा: किणी प्रकरणाची आठवण करून देत आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Sharad Pawar Pm Modi Meeting) यांची भेट घेतली होती. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात दोघा नेत्यांमध्ये ही भेट झाली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील विविध नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं सांगितलं जातंय. तसंच विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातही दोघा नेत्यांमध्ये भेट असू शकते, असा अंदाज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Web Title: Nana Patole Reacted To The Meeting Between Sharad Pawar And Pm Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..