आता गप्प बसणार नाही, त्रास देणाऱ्यांचा हिशोब चुकता करणार; आमदार गोरेंचा नेमका निशाणा कोणावर?

'मंत्रिपद असताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला.'
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goreesakal
Summary

'मंत्रिपद असताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला.'

उंब्रज (सातारा) : मंत्रिपद असताना ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हिशोब चुकता करणार आहे. यापुढे भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी येथे दिला. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व ताकदीनिशी कामाला लागा, असेही आवाहन त्यांनी केले.

भाजपच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यांतर्गत येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. युवा नेते धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, उत्तर तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले,‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य माणसाला उभारी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना राबवून थेट लोकांपर्यंत पोचवण्याची दक्षता घेतली. त्यामुळेच कृषी सन्मान योजना, घरकुल उज्ज्वला योजना यासारख्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. कोरोनाकाळात मोफत लसीकरण दिले. महाविकास आघाडीने मात्र, कोरोना काळात जनतेला एकटेच सोडले. माजी सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अडीच वर्षांत मंत्र्यांनी काय काम केले हे दाखवून द्यावे. एकही मोठा प्रकल्प आणला नाही. सह्याद्री कारखाना हा सभासदांचा असून, तो सध्या खासगी प्रॉपर्टी झाला आहे. भाजपचे जिल्ह्यात मजबूत संघटन करणार आहे.’’

MLA Jaykumar Gore
Congress : दोन दशकांनंतर काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

'अडीच वर्षांत सर्वसामान्य जनतेला त्रास झाला'

धैर्यशील कदम म्हणाले, ‘‘अडीच वर्षांत सर्वसामान्य जनतेला त्रास झाला. जनतेला अपेक्षित असणारी कामे झाली नाहीत. काही कार्यकर्त्यांना विरोधक असल्याने त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सत्ता परिवर्तन झाले असून, मागचे दिवस राहिले नाहीत. उंब्रज गावचा विकास आजतागायत झाला नाही, ही शोकांतिका आहे. कऱ्हाड उत्तरेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.’’ श्री. वेताळ, श्री. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

MLA Jaykumar Gore
UNGA : 'शांततेबद्दल बोलून दहशतवाद पसरवणं हे तुमचं काम'; पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com