esakal | 'मेडिकल कॉलेजची जागा मोकळी करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने कारवाई' I Shivsena
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh shinde
शेतीमाल विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होणार

'मेडिकल कॉलेजची जागा मोकळी करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने कारवाई'

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : तालुक्यातील तळिये-नलवडेवाडी- जांब या खिंड रस्त्यासाठी वन हद्दीतील २.१६ हेक्टर जमीन संपादनास केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यामुळे हा रस्ता होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने चिमणगाव, हिवऱ्यापासून वाठारमार्गे पुण्याकडे जाण्यासाठीचे अंतर १२ ते १५ किलोमीटरने कमी होणार असून, यामुळे प्रमुख बाजारपेठांमध्ये शेतीमाल विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होणार असल्याची माहिती आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरेगाव मतदारसंघातील (Koregaon Constituency) रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत, हीच भावना असल्याचे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, ‘‘विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हिवरेचे सरपंच अजित खताळ यांच्यासह तळिये, किन्हई, जांब येथील शेतकऱ्यांची ही मागणी होती. त्या वेळी हा रस्ता करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण होत आहे. लॉकडाउनमुळे, तसेच काही पूर्तता राहिल्याने हा प्रस्ताव तीन वेळा वन विभागाकडून माघारी आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या खिंड रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’’

हेही वाचा: 'त्यांना घेऊन निवडणूक लढवणार असाल, तर तो शरद पवारांचा अपमान असेल'

कोरेगाव मतदारसंघातील रस्ते मजबूत, व्यवस्थित झाले पाहिजेत, हीच आपली भावना असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. हिवरे, तळिये येथील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांची रस्त्याची मागणी आमदार शिंदे यांनी जातीने लक्ष घालून पूर्ण केल्याचे अजित खताळ यांनी सांगितले. सुमारे ३५ वर्षांपूर्वी माजी आमदार शंकरराव जगताप यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांनी या रस्त्याची मागणी केली होती. आमदार शिंदे यांच्यामुळे या रस्त्याला मूर्त स्वरूप आल्यामुळे लोणंद, पुणे मार्केट जवळ आली असल्याचे हणमंतराव जगदाळे यांनी सांगितले.

हेही वाचा: 'टपाल' हा इतिहासाचा मौल्यवान ठेवा, काळ बदलला तरी महत्व कायम

प्रशासनाच्या कारवाईचा निषेध

कृष्णानगर येथील मेडिकल कॉलेजची (Krishnanagar Medical College) जागा मोकळी करण्यासाठी हुकूमशाही पद्धतीने कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करत असल्याचे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, ‘‘प्रशासनाने कारवाई करून या भागातील लोकांना, गाळेधारकांना बेघर केले आहे. प्रतापसिंहनगरमधील शाळा पाडली आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक केली आहे. त्यांनी पुनर्वसन करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध मी हायकोर्टात पिटीशन दाखल करणार आहे आणि केंद्र व राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहे.’’

हेही वाचा: उदयनराजेंचं मोठं वलय आहे, शब्द आहे.. यावर 'राजे' काय म्हणाले, माहितीय?

loading image
go to top