esakal | मुस्लिम बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणू: आमदार शिंदे
sakal

बोलून बातमी शोधा

मुस्लिम बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणू: आमदार शिंदे

शहरातील मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते.

मुस्लिम बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणू: आमदार शिंदे

sakal_logo
By
राजेंद्र वाघ - सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव (सातारा): कोरेगाव शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणले जाईल, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली. शहरातील मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा: सातारा शहराचे होणार गुगल मॅपिंग! नगरपालिकेची तयारी

यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्र. बर्गे, सुनील खत्री, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जयवंत पवार, महेश बर्गे, राहुल र. बर्गे, सुनील बर्गे, राजेंद्र य. बर्गे, श्रीकांत बर्गे, महेश शा. बर्गे, सागर बर्गे, अक्षय बर्गे, संतोष बर्गे, सुनील निदान, रवींद्र बोतालजी, प्रदीप बोतालजी आदी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘मुस्लिम समाजाच्या विकासाबाबतच्या मागण्या प्राधान्याने सोडवून या समाजबांधवांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’ आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय योग्य असल्याचे श्री. खत्री यांनी सांगितले. मुस्लिम समाजाचा हा निर्णय कोरेगावच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार असून, या बांधवांना सामाजिक न्याय दिला जाणार असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी नमूद केले. आमदार महेश शिंदे समाजाच्या विकासासाठी मार्गदर्शन करून साथ देतील, असा विश्‍वास मुन्नाभाई काझी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: सातारा : काडोलीजवळ गाईंचा टेंपो ताब्यात; पाटणमधील तिघांवर गुन्हा

या वेळी जयवंत पवार, महेश बर्गे यांचीही भाषणे झाली. या वेळी मुन्नाभाई काझी, हमीद मुल्ला, नूरअल्ली पटवेकर, रशीद शेख, दिलावर शिकलगार, नूरमहंमद जमादार, सलीम काझी, फिरोज सय्यद, गोविंद शिकलगार, सर्फराज नदाफ, राजूभाई मुल्ला, सलमान काझी, राजूभाई बागवान, नौशाद शेख, हरुण काझी, सत्तार नदाफ, समीर गोलंदाज, नौशाद पठाण, बाळासाहेब मुजावर, रफिकभाई मुलाणी, अजमुद्दिन मुल्ला, अल्ताफ मुल्ला, दिलावर शेख, शरीफ पटवेकर, दस्तगीर सय्यद, वसीम शेख, आयुब शेख यांचे सत्कार झाले.

loading image
go to top