esakal | 'वाकुर्डे'चे पाणी जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत सोडा; माजी मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पाधिकाऱ्यांना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Prithviraj Chavan

'वाकुर्डे'चे पाणी जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत सोडा; माजी मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पाधिकाऱ्यांना आदेश

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : वाकुर्डे योजनेचे पाणी आठवड्यात जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत सोडा. त्यासाठी अत्यावश्‍यक त्या सगळ्या उपाययोजना करा. पाणी जुजारवाडीपर्यंत पोचल्यानंतर उन्हाळ्यातील पाणीटंचाई जाणवणार नाही, अशा सूचना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या.

वाकुर्डे, येणपे, महारुगडेवाडी, उंडाळे प्रकल्प अधिकाऱ्यांची आमदार चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, टेंभू उपसाचे कार्यकारी अभियंता आर. पी. रेड्डीयार, वारणाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, टेंभूचे उपविभागीय अभियंता आबासाहेब शिंदे, जलसंधारणचे एम. एस. पवार, जलसंपदाचे सतीश चव्हाण, कृष्णा कालवाचे सुधीर रणदिवे, महावितरणचे फिरोज मुलाणी, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, उदय पाटील, नानासाहेब पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात उपस्थित होते.

शाब्बास! गावच्या पोरांनी करुन दाखवलं; WhatsApp मधून गोळा केली 'आरोग्य'साठी लाखोंची मदत

आमदार चव्हाण म्हणाले, ""वाकुर्डे उपसा योजनेचे पाणी सोडले जावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. भागात शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळेच शेतकऱ्यांचा मागणीचा विचार करून वाकुर्डे योजनेचे पाणी तत्काळ सोडले जावे. पाणी जुजारवाडीपर्यंत जात नाही, तोपर्यंत कोणीही पाणी उपसा करू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना महावितरण अधिकाऱ्यांनी कराव्यात.''

कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : आमदार पाटील

दक्षिण मांड खळखळणार

वाकुर्डे योजनेचे पाणी तत्काळ सोडण्याबाबत आमदार चव्हाण यांनी बैठकीत सूचना केल्या. पाणी जुजारवाडी बंधाऱ्यापर्यंत पोचेल. त्यामुळे दक्षिण मांड नदी पुन्हा एकदा खळखळणार आहे. त्या पाण्याचा उपयोग नांदगाव, ओंड, मनव, काले, उंडाळे, टाळगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसह पिण्यासाठी होतो.

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top