आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्नाचा सिझन आला म्हणून बोलावलं; सदाभाऊ खोतांचा भाजपला सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेतले जात आहेत. आज सांगली जिल्ह्यात मेळावा पार पडला. यावेळी सभेमध्ये बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आपली व्यथा सांगितली.
mla sadabhau khot
mla sadabhau khot

सांगली- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेतले जात आहेत. आज सांगली जिल्ह्यात मेळावा पार पडला. यावेळी सभेमध्ये बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आपली व्यथा सांगितली. निवडणुका आल्या म्हणून आता आम्हाला बोलावलं जातंय, असं ते सभेमध्ये म्हणाले. (mla sadabhau khot criticize bjp leaders in sangli alliance rally)

आम्हाला काही द्या नका द्या पण आम्ही तुमच्यासोबत आहोत. मुंबईच्या बैठकीमध्ये मी गेलो होतो. नेते म्हणाले आता कामाला लागा, योजना लोकांपर्यंत पोहोचवा. मी म्हणालो तुम्ही आम्हाला काय समजलंय. आम्हाला काय बँडवाले समजलंय का? लग्न ठरायला आलंय म्हणून ताशे-पिपाणी, ढोल पाहायला लागलाय. आम्हाला फक्त वाजवायला बोलावताय का? नेमकं आम्हाला बोलावलंय का? असा संतप्त सवाल त्यांनी भाजप नेत्यांना केला.

mla sadabhau khot
Loksabha Election : ठरलं! सदाभाऊ आता थेट जुन्या भिडूलाच भिडणार; लोकसभेसाठी 'या' मतदारसंघातून आजमावणार ताकद

घटक पक्षाला एक सदस्यपद देऊ शकत नाही. आणि मग म्हणायचं आमची महायुती. म्हणजे नेमकी कोणाची युती आहे. त्यामुळे मला स्पष्ट सांगायचंय आमचा अपमान करु नका. आम्ही लढणारे नेते आहोत. पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आम्ही लढायला तयार आहोत, असं खोत म्हणाले. घटक पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर बैठकीला बोलावले आहे. शेवटी का होईना आमची आठवण झाली, असं म्हणत त्यांनी चिमटा काढला.

mla sadabhau khot
Loksabha Election : 'महायुती'ची एकजूट करणार महाविकास आघाडीची अडचण; मनोज घोरपडे-धैर्यशील कदम यांच्यात समेट

आम्ही चळवळीतले नेते आहोत. शेवटी निवडणुकीच्या शेवटी का होईना आमची आठवण आली. सत्तेच्या काळात घटक पक्षांना उचित सन्मान दिला नाही. निधीपण दिला नाही. सर्व घटक पक्षांना तुम्ही बोलवायला हवं होतं. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही खुरपी घेऊन आलोय. तण काढतोय. पण, आमची उपेक्षा करु नका, अशी विनंती त्यांनी केली. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com