सातारारोड: देशात, राज्यात आणि कोरेगाव मतदारसंघात प्रशासन दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी लोकांनी जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.