'ज्यांना मी वाढवलं, तेच मला हद्दपार करायला निघालेत; वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड करेन' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shashikant Shinde

'मी थोडा गाफिल राहिलो, म्हणूनच मला निवडणुकीला सामोरे जावे लागले.'

'ज्यांना मी वाढवलं, तेच मला हद्दपार करायला निघालेत'

कुडाळ (सातारा) : जिल्हा बँकेची जावळी सोसायटीची निवडणूक (Jawali Society Election) ही राजा विरुध्द प्रजा अशीच झाली. त्यामुळेच ही निवडणूक जिल्ह्यात नव्‍हे, तर महाराष्ट्रात गाजली. जावळी तालुक्यात ज्यांना मी वाढवले, तेच मला हद्दपार करायला निघालेत. मात्र, आता तालुक्यात नवी समीकरणे उदयास येणार, हे निश्चित आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वज्रमूठ तयार केली असल्याने वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड करण्याची ताकद माझ्यात आहे, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी दिला.

यावेळी ते म्हणाले, जावळी सोसायटीतून जिल्हा बँकेसाठी निवडणुकीला सामोरे जाताना शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार, तसेच जिल्ह्यातील नेते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आदी सर्वांनी मनापासून माझ्यासाठी प्रयत्न केले, ही वस्तुस्थिती आहे. या सर्वांनी माझ्यासाठी काल रात्रीपर्यंत प्रयत्न केले. मात्र, ते निष्फळ ठरले.

हेही वाचा: ..तर माझा नाईलाज आहे; जावळीतील राड्यानंतर आमदार शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मी काही दिवसांसाठी आजारी असल्याने त्या कालावधीत मी थोडा गाफिल राहिलो म्हणूनच मला निवडणुकीला सामोरे जावे लागले.’’ आमदार शिवेंद्रसिंहराजेंनीही तुम्हाला मदत केली का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच आमदार भोसले यांचे नाव न घेता त्यांनी ‘मला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण, दुर्दैवाने त्यांना त्यात यश आले नाही,’’ अशी टिप्‍पणी शिंदे यांनी दिली.

हेही वाचा: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'

जावळी तालुक्यात यापुढे पक्षसंघटना वाढविण्यासाठी मला जातीने लक्ष घालावेच लागेल.

-शशिकांत शिंदे, आमदार

हेही वाचा: आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले

loading image
go to top