..तर माझा नाईलाज आहे; जावळीतील राड्यानंतर आमदार शिंदेंची पहिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shashikant Shinde

'कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील, तर माझा नाईलाज आहे.'

..तर माझा नाईलाज आहे; जावळीतील राड्यानंतर आमदार शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

सातारा : आज सकाळी 8 वाजता मेढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र (Zilla Parishad Primary Center) शाळेच्या इमारतीत प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. निवडणुकीच्या (Satara Bank Election) पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, याचदरम्यान आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांचे बंधू ऋशीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) आमनेसामने भिडले व दोन्ही गटात सकाळी राडा झाला. यावरती आमदार शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

हेही वाचा: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'

आमदार शिंदे म्हणाले, मी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (Nationalist Congress Party) वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करतोय. राष्ट्रवादीच्या मजबुतीसाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यातून कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील, तर माझा नाईलाज आहे. यापूर्वी जावळीत मी लक्ष घातलं नव्हतं, परंतु आता जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे शिंदेंनी नमूद केले. दरम्यान, जिल्हा बॅंकेत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील याची मला खात्री असून बॅंकेत पुन्हा आमचीच सत्ता येणार आहे, असा विश्वास बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: 'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

जावळी मतदारसंघात (Jawali constituency) आमदार शशिकांत शिंदेंविरोधात आव्हान निर्माण करणाऱ्या ज्ञानदेव रांजणे यांची समजूत काढण्यासाठी काल दिवसभर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खल सुरू होता. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Speaker Ramraje Naik Nimbalkar), आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil), शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रांजणे यांच्या घरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. स्वीकृत संचालक करण्याची ऑफरही त्यांना दिली. मात्र, ती त्यांनी धुडकावत उलट ऑफर दिली. त्यामुळं आमदार शिंदेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय.

हेही वाचा: 'निवडणुकीत NCP सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील'

loading image
go to top