
सातारारोड: कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने कोणतीही कल्पना न देता आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी बेकायदेशीररीत्या प्रवेश करून चौकशी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यासह संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. साहिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुपारी कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, जुजबी उत्तरे दिली जात असल्याने पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन दिले.