निवडणुकीत कोणत्याही आव्हानांची भीती नाही; भाजप आमदाराचा विरोधकांना इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivendrasinharaje Bhosale

'सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद असल्याने मला कुठल्याही आव्हानांची भीती नाही'

निवडणुकीत कोणत्याही आव्हानांची मला भीती नाही : शिवेंद्रसिंहराजे

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर : जावळी तालुक्यात (Jawali Taluka) गेल्या दहा वर्षात विकासकामांच्या माध्यमातून जनतेशी घट्ट नाते निर्माण झाले आहे. त्या गावचे मतदान किती आहे, त्या गावची लोकसंख्या किती आहे, हा विचार न करता भाऊसाहेब महाराजांनी दिलेल्या शिकवणीनुसार आणि जनतेच्या मागणीनुसार, जावळी तालुक्यातील डोंगरमाथ्यावर विकासकामे केली जात आहेत. जावळी तालुक्यातील जनतेचे पाठबळ व आशीर्वाद माझ्या मागे असून जनता भक्कमपणे पाठीशी असल्याने मला निवडणुकांमध्ये कोणत्याही आव्हानांची भीती नाही, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी आज गाढवली पुनर्वसन येथे एका कार्यक्रमात विरोधकांना दिला.

जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून तालुक्यातील दुर्गम गावातील दळणवळणाचा प्रश्न सोडवून लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. आज गाढवली पुनर्वसन (ता. जावळी) येथे आमदार भोसले यांच्या निधीतून प्राथमिक शाळा व मंदिर परिसरातील संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन भोसले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गाढवलीचे सरपंच बबनराव शिंदे, माजी सरपंच प्रकाश शिंदे, माजी सरपंच सुनील जांभळे, युवा नेते सागर धनावडे, विनोद माने, जानू माने, प्रवीण पाटणे, विक्रांत धनावडे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: 'उदयनराजेंना 'बिनविरोध' करता अन् माझा पराभव, मी दुधखुळा नाही'

Shivendrasinharaje Bhosale

Shivendrasinharaje Bhosale

शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, जावळीतील जनतेनं माझ्यावर भरभरून प्रेम केलंय. या प्रेमातून उतराई होण्यासाठी रखडलेली कामे प्राधान्यानं पूर्ण करत आहे. जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. तालुका हा दुर्गम व डोंगराळ असल्याने दळणवळण सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुनवडी पुलाची तात्पुरती दुरुस्ती जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी स्वखर्चाने केले आहे. या पुलाचे कामही मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. गाढवली गावातील रखडलेली कामे लवकरच मार्गी लावली जातील. तसेच केळघर बाजारपेठेसाठी महत्वाचा असलेल्या केळघर-कुरळोशी -कुरोशी रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागत आला आहे. जावळीतील सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद असल्याने मला कुठल्याही आव्हानांची भीती नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. यावेळी ग्रामस्थ युवक उपस्थित होते. बबनराव शिंदे यांनी स्वागत केले. प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.

हेही वाचा: 'मोदींच्या दाढीत घरंच घरं'; एकदा दाढी झाडली की, 50 लाख घरं बाहेर पडतात'

loading image
go to top